पिंपरी- चिंचवड : खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना आगामी पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या युतीचा प्रस्थाव दिल्याचा दावा पिंपरी- चिंचवड राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला आहे. यावर आता शरद पवार यांच्या पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी प्रतिक्रिया दिली असून बहल यांचा दावा खोडून काढला आहे.

अजित पवार भाजप विरोधी उघड लढणार असतील तर त्यांचं स्वागत करू असा चिमटा त्यांनी बहल यांच्या दाव्यावरून काढला आहे. अजित पवारांच्या पक्षासोबत कुठलीही बैठक झाली नाही. स्थानिक नेत्यांसोबत चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीत सोबत येऊन त्यांना भाजप विरोधी भूमिका घ्यावी लागेल अस तुषार कामठे यांनी म्हटलं आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची आगामी महानगर पालिकेच्या युतीची बातमी प्रसारमाध्यमातून बघितली. भाजपला हद्दपार करण्यासाठी शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांची पक्ष एकत्र येत असतील तर सोबत घेऊ. महाविकास आघाडी म्हणून आमचं जागा वाटपाची बोलणी सुरू आहे. कुणाची ताकद किती आहे? हे आत्ताच सांगू शकत नाही. जिथं आमची ताकद आहे, तिथं आमचा उमेदवार देणार आहोत. अजित पवारांचे स्थानिक नेते, शहराध्यक्ष समोर आल्यास चर्चा करू. अस ही त्यांनी अधोरेखित केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांची योगेश बहल अडचण वाढवत आहेत?

आधीच पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी अजित पवारांना येन महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. ते प्रकरण अद्याप ही सुरू आहे. अंजली दमानिया यांनी पार्थ पवारांवर कारवाई करण्याची मागणी केली. अशातच आता सुप्रिया सुळे यांनी आगामी महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर युतीचे निरोप देऊन अजित पवारांशी चर्चा केल्याच्या दाव्यामुळे भाजप दुखावू शकते.

अजित पवारांच्या अडचणी वाढू शकतात. अस बोललं जातं आहे. राज्यात महायुती म्हणून दोन्ही पक्ष एकत्र आहेत. परंतु, केवळ महानगर पालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांचा पक्ष एकत्र येऊ शकतो का? हा संभ्रम आहे. शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या दाव्यात किती सत्यता आहे. हे लवकरच पुढे येईल.