कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये ज्या घटना घडल्या आहेत त्या गृह खात्याचे अपयश असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. महिला, स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत. दुसरीकडे हे सरकार बेटी पढाव बेटी बचाव नारा देऊन नागरिकांची दिशाभूल करत आहे. असा टोला देखील त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारला लगावला आहे. त्या आळंदीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

अहमदनगर आणि कोल्हापूरमध्ये ज्या घटना घडल्या आहेत. ते गृह खात्याचे अपयश आहे. जर बंटी पाटील यांना अगोदरच अशा घटना होऊ शकतात हे कळत असेल आणि सरकारला कळत नसेल हे नक्कीच सरकारचं अपयश आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. महिला, मुलींवर अत्याचार होत आहेत. दुसरीकडे बेटी बचाव बेटी पढाव चा नारा हे सरकार देत आहे.

हेही वाचा >>> मोसमी वारे केरळमध्ये दाखल, हवामान विभागाकडून आनंदाची बातमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्लीमध्ये महिला कुस्तीपटूंना त्यांच्या हक्कासाठी आंदोलन करावे लागते आहे. दिल्लीतील सरकार कुस्तीपटूंना ज्या पद्धतीने वागवत आहे. त्याचा मी निषेध करते असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान, शरद पवार यांनी संभाजीनगरवर एक वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यावरील प्रश्नावर सुप्रिया सुळे पत्रकारावर भडकल्या. शरद पवार असं म्हणलेच नाहीत असं सांगत ते तुमच्या वडिलांच्या वयाचे आहेत. जे लोक अस म्हणत असतील त्यांना लाज वाटली पाहिजे असं देखील त्या म्हणाल्या आहेत.