पिंपरी : अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने ‘स्वच्छ तीर्थ अभियान’ हाती घेतले आहे. या अंतर्गत २१ जानेवारीपर्यंत शहरातील ५३ मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेमध्ये वापरण्यायोग्य वस्तूंचे संकलन केले जाणार आहे. या वस्तू क्षेत्रीय कार्यालयातील कचरासंकलन केंद्रावर जमा केल्या जाणार आहेत. मंदिर परिसरात निर्माल्यकलशांची व्यवस्था, प्लॅस्टिकबंदीबाबत जनजागृती केली जाणार आहे. क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, मंदिराचे पदाधिकारी, कर्मचारी, माजी नगरसेवक, नागरिक, शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थी, सेवाभावी संस्था, महिला बचत गट यांना सहभागी करून मोहीम राबवली जाणार आहे. दररोज स्वच्छ तीर्थ अभियान मोहिमेपूर्वीचे, मोहीम करताना व मोहीम झाल्यानंतरचे छायाचित्र स्वच्छ भारत अभियानाच्या संकेतस्थळावर टाकावे लागणार आहे.

हेही वाचा : प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यादिनी फटाक्यांची आतषबाजी, महापालिकेकडून फटका स्टॉल्सला परवानगी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात आठ क्षेत्रीय कार्यालये असून, ३२ प्रभाग आहेत. सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत शहराच्या विविध भागातील रस्ते, चौकात स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच रस्ते, चौक पाण्याने स्वच्छ धुऊन काढण्यात येणार आहेत. यासाठी वाहतूक पोलिसांशी समन्वय साधला जात असल्याचे सहायक आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.