लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांनी स्थापन केलेले रूपवेध प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या वतीने रंगकर्मी लकी गुप्ता यांना यंदाचा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लकी यांनी ‘थिएटर ऑन व्हील्स’ या संकल्पनेतून भारतभर भ्रमण करून आठशेहून अधिक ठिकाणी विविध एकल नाटके सादर केली आहेत.

आणखी वाचा-पुणे : कांदा, मिरची, वांगी, ढोबळी मिरचीच्या दरात अल्प घट

टिळक रस्त्यावरील ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ नाटककार राजीव नाईक यांच्या हस्ते लकी गुप्ता यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या निमित्ताने महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि लागू कुटुंबीय यांच्या पुढाकाराने नव्याने उभारण्यात येत असलेल्या श्रीराम लागू रंगअवकाशाबद्दल आणि भारतीय रंगभूमीविषयी राजीव नाईक यांचे भाषण होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लकी गुप्ता यांनी सादर केलेल्या नाटकांची प्रयोगसंख्या काही हजारांच्या घरात आहे. ‘माँ, मुझे टागोर बना दे’ या नाटकाचा १३०२ वा प्रयोग त्यांनी नुकताच भोपाळ येथे सादर केला.