शाळांमध्ये शिक्षक मुलांना शिक्षा करत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं दिसून आलं आहे. त्यासंदर्भात संबंधित शिक्षकांना समजर किंवा प्रसंगी कारवाईलाही सामोरं जावं लागलं. आता विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यातला असाच एक प्रकार समोर आला आहे. एका ४० वर्षीय शिक्षिकेनं अवघ्या ३ वर्षांच्या चिमुकलीला अमानवी पद्धतीने वागवल्याचा प्रकार उघड झाला असून या शिक्षिकेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्याच्या कोथरूड भागातला हा प्रकार आहे. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, कोथरुडच्या एका नर्सरीमध्ये ही चिमुकली असताना तिथल्या शिक्षिकेनं तिचे केस ओढले, तसेच तिच्या गालाला चिमटेही काढले. १८ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट यादरम्यान हे सर्व घडल्याचं मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या शिक्षिकेनं मुलीला मेणबत्तीने चटके देण्याचीही धमकी दिल्याचं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मुलीच्या पालकांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कलम ३२३, ५०६ आणि ज्युवेनाईल जस्टिस अॅक्टच्या कलम ७५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.