पुणे : संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन सेक्स टाॅइजची विक्री करण्याचा प्रकार लष्कर पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी एका गोदामावर छापा टाकून दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अज्ञातांच्या विरोधात लष्कर पोलिसांनी भादंवि २९२ (अश्लील साहित्य बाळगणे), भादंवि २९३ (लहान मुलांकडून खरेदी होईल अशा वस्तुंची विक्री करणे) या कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. सेक्स टाॅइजचा वापर लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी केला जातो.
एका संकेतस्थळावर बेकायदा सेक्स टाॅइजची विक्री होत असल्याची माहिती लष्कर पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली होती. त्यानंतर लष्कर पोलिसांच्या पथकाने लष्कर भागातील पूलगेट परिसरातील एका गोदामावर छापा टाकून दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
हेही वाचा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!
एका संकेतस्थळाच्या माध्यमातून सेक्स टॉइजची विक्री सुरू होती. संकेतस्थळाच्या माध्यमातून खरेदी करणाऱ्याच्या वयाची तपासणी न करता विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुलगेट येथील गोदामावर छापा टाकून कारवाई करण्यात आल्याची माहिती लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली.