पुणे : कमी वेळात जास्त येणारा पाऊस गेल्या तीन ते चार वर्षांत पुणेकरांनी अनुभवला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने यंदा पूरस्थितीचा आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. त्यानुसार संभाव्य पुरामुळे नागरिकांना स्थलांतरित करावी लागणारी शहरातील दहा ठिकाणे प्रशासनाकडून निश्चित करण्यात आली आहेत. तसेच पुराचा धोका असलेली तब्बल २३ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. याशिवाय जिल्हा प्रशासनाने शहरातील भुयारी मार्ग, पावसाळय़ात बाधित होणारे पूल यांची यादीही जाहीर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हा प्रशासनाकडून खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून किती पाण्याचा विसर्ग केल्यावर शहरातील कोणता भाग बाधित होईल, अशी यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार विसर्गाचे प्रमाण ४० हजार क्युसेक वेगाने असल्यास सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. विसर्गाचे प्रमाण ५० हजार क्युसेकपर्यंत गेल्यास संबंधित भागातील नागरिकांचे स्थलांतर करणे आवश्यक आहे.

त्यानुसार दिवणी मेटल वर्कस एरंडवणा खिलारे वस्ती, पुलाची वाडी डेक्कम जिमखाना, पीएमपी आगार डेक्कन जिमखाना मागील बाजू, तोफखाना परिसर आणि कामगार पुतळा शिवाजीनगर, पुना रुग्णालय पिछाडी लगतचा भाग, सीताबाग कॉलनी व अष्टभुजा मंदिर नारायण पेठ, अमृतेश्वर मंदिराजवळील भाग शनिवार पेठ, ओटा घाट, नेने घाट, शेख सल्ला दर्गा, डेंगळे पूल कसबा पेठ, बारणे रस्ता मनपा वसाहत, गाडीतळ झोपडपट्टी, ताडीवाला रस्ता झोपडपट्टी परिसर आणि आंबिल ओढा लगतचा भाग यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे, तर कोंढवे-धावडे, भीमनगर, समाज मंदिर ओढय़ालगतचा भाग, न्यू कोपरे हद्दीजवळ, उत्तमनगर इंदिरावसाहत, शिवणे नदीलगतचा भाग, वारजे तपोधाम, नांदेड नदीलगतचा भाग, वडगाव बु. सर्वे. क्र. १४ व १५, हिंगणे खुर्द सर्वे क्र.१८, अलंकार पोलीस चौकीजवळील भाग कर्वेनगर रस्ता, दत्तवाडी व राजेंद्रनगर या भागातील नागरिकांना कदाचित स्थलांतरित करावे लागणार असल्याचे अहवालात नमूद केले आहे. दरम्यान, मॉडर्न भुयारी मार्ग, वाकडेवाडी भुयारी मार्ग, हॅरिस ब्रिज सीएमईकडे जाणारा मार्ग, दत्तनगर भुयारी मार्ग हे भुयारी मार्ग बाधित होण्याची शक्यता आहे.

पावसाळय़ात बाधित होणारे पूल

मुठा नदीवरील – खडकवासला धरण नदी पूल, शिवणे नांदेड पूल, पेशवेकालीन शिव मंदिराजवळील आंबिल ओढय़ावरील पूल पर्वती गाव, आंबेडकर वसाहत लक्ष्मीनगर जवळील आंबिल ओढय़ावरील पूल, बाबा भिडे पूल, नदी पात्रातील वाहतुकीस असणारा वर्तक उद्यानाकडील रस्ता, खिलारेवाडी गावठाणाकडील रस्ता, नाना नानी उद्यानासमोरील रस्ता, रामनदीवरील महाबळेश्वर हॉटेल, रानवारा चौक येथील छोटा पूल, तर मुळा नदीवरील पुलांमध्ये औंध सीएक्युई यांना जोडणारा पूल, सुतारवाडी, पाषाण तलावालगतचा परिसर, बाणेर स्मशानभूमीजवळ, औंध घाट यांचा समावेश करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ten places city evacuated possible fixed flood prone places ysh
First published on: 18-05-2022 at 00:02 IST