पुणे : देशातील मुलांना आयएएस, आयपीएस, खेळाडू होण्यापेक्षा पोलिस, शिक्षक होण्यात जास्त रस आहे. तसेच २१ टक्के मुलांना काय करायचे याची माहिती नाही किंवा विचार केलेला नाही, तर २.१ टक्के मुलांना काम करण्यात रस नसल्याचे समोर आले आहे.  ‘असर’ने बियाँड बेसिक्स हा अहवाल नुकताच जाहीर केला. त्यात देशभरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्थितीसह विद्यार्थ्यांच्या करिअरबाबतही सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून विद्यार्थ्यांचे कल स्पष्ट झाले आहेत. अहवालातील आकडेवारीनुसार, देशभरातील १३ टक्के मुलांना पोलिस होण्यात रस आहे. त्यात  १३.६ टक्के मुलगे, तर १२.५ टक्के मुली आहेत. शिक्षक होण्याची इच्छा असलेल्या ११.४ टक्के मुलांमध्ये १६ टक्के मुली, तर ६ टक्के मुलगे आहेत. १४.८ टक्के मुलींना डॉक्टर व्हायचे आहे, तर ८.४ टक्के मुलींनी परिचारिका होण्याची इच्छा आहे. ७.७ टक्के मुलांना लष्करात जाण्याची इच्छा आहे. त्यात १३.३ टक्के मुलगे, तर २.४ टक्के मुली आहेत.

हेही वाचा >>> ‘एफटीआयआय’च्या आवारात बाबरी मशिदीबाबत वादग्रस्त फलक, विद्यार्थी संघटनांमध्ये बाचाबाची

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभियंता होण्याची इच्छा ६.३ टक्के मुलांना आहे. त्यात ९.६ टक्के मुलगे, तर ३.४ टक्के मुली आहेत. कोणतीही सरकारी नोकरी चालेल शी ४.६ टक्के मुले आहेत. त्यात ५.४ टक्के मुले आणि ३.९ टक्के मुली आहेत. प्रशासकीय सेवांमध्ये आयएएस आणि आयपीएस ही सनदी अधिकारी पदांचा विशेष महत्त्व आहे. मात्र केवळ २ टक्के मुलांना आयएएस, १.४ टक्के मुलांना आयपीएस होण्यात रस वाटत आहे.  १.९ टक्के मुले स्वत:चा किंवा कौटुंबिय व्यवसाय करणार आहेत, तर शेतीसंबंधित कामे १.४ टक्के मुले करणार आहेत. १.६ टक्के मुलांना खासगी नोकरी करण्याची इच्छा आहे. तर केवळ १.२ टक्के मुलांना खेळाडू व्हायचे आहे. एकीकडे काहीतरी होण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांबरोबरच ‘काय करायचे हे माहीत नाही किंवा त्याबाबत विचार केलेला नाही’ अशा मुलांचे प्रमाण २१ टक्के आहे. त्यात १९.९ टक्के मुले, तर २२ टक्के मुली आहेत. त्याचबरोबर ‘काहीही काम करायचे नाही’ असा प्रतिसाद २.१ टक्के मुलांनी दिला आहे.