यंदाही गुणवत्ता यादी नाही
पुणे : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल ऑफ सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सच्या (सीआयएससीई) दहावी (आयसीएसई) आणि बारावीच्या (आयएससी) परीक्षांचा निकाल शनिवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. त्यात देशपातळीवर दहावीचा निकाल ९९.९८ टक्के , तर बारावीचा निकाल ९९.७६ टक्के  लागला असून यंदाही विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सीआयएससीईने दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्याची घोषणा केली होती. दहावीसाठी यंदा २ लाख १९ हजार ४९९ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यात १ लाख १८ हजार ८४६ मुले, १ लाख ६५३ मुली होत्या. दहावीचा एकू ण ९९.९८ टक्के  विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुले आणि मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण समान म्हणजे ९९.९८ टक्के  आहे. तर बारावीसाठी ९४ हजार ११ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी ५० हजार ४५९ मुले, ४३ हजार ५५२ मुली होत्या. बारावीचा एकूण निकाल ९९.७६ टक्के  लागला. त्यात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.८६ टक्के , तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.६६ टक्के  आहे. बारावीचे २३० आणि दहावीचे ४५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tenth result of cisce there is no quality list this year either akp
First published on: 25-07-2021 at 00:02 IST