पुणे : पुण्यात पकडलेल्या दोन दहशतवाद्यांच्या सूत्रधाराचा राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) शोध सुरू करण्यात आला. अला सुफा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या दहशतवाद्यांनी बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले असून, ते पुण्यात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे.

कोथरूडमधून दुचाकी चोरीच्या प्रयत्नात असताना महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान  आणि महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी यांना अटक करण्यात आली होती. दोघांना आश्रय देणाऱ्या अब्दुल कादीर दस्तगीर पठाण  यालादेखील अटक करण्यात आली आहे. त्यानंतर एका खासगी कंपनीत कामाला असलेल्या अभियंता सिमाब नसरुद्दीन काझी याला रत्नागिरीतून अटक करण्यात आली. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉक्टर, अभियंता दहशतवादी कारवायांमध्ये पुण्यातील एका रुग्णालयात डॉक्टर असलेल्या अदनान अली सरकार याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली. ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेचा प्रसार करण्याचे काम डॉ. सरकार करत होता. पुण्यात बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असताना दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी पकडले. त्यांना आर्थिक रसद पुरविणाऱ्या अभियंता सिमाब काझी याला रत्नागिरीतून अटक करण्यात आली. सिमाब काझी मेकनिकल इंजिनिअर आहे. त्याला वार्षिक वेतन १५ लाख रुपये आहे.