भाजपाच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल भाजपाचे सहयोगी खासदार यांनी केलेलं वक्तव्य व त्यांच्यावर केलेल्या टीकेवर सध्या वातावरण गरम झाल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या आमदार व पुणे शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. खासदार काकडे यांनी  असं बोलायला नको होतं, हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, भाजापाचा त्यांच्या वक्तव्याशी काहीही संबंध नाही, असं आमदार मिसाळ यांनी पत्रकारपरिषद घेऊन स्पष्ट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंकजा मुंडेंबद्दल काकडे यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांच वैयक्तिक मत आहे, भाजपाशी त्याचा काहीही संबंध नाही. भाजपातील कोणत्याही कार्यकर्त्यांपासून वरिष्ठपातळीपर्यंतच्या कोणत्याही नेतृत्वाचं असं काही म्हणनं नाही. त्यामुळे काकडे यांनी जे वक्तव्य केलं हे त्यांच वैयक्तिक मत आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्याइतपत मला नाही वाटत की, त्यांच्या वक्तव्याला महत्व दिलं पाहिजे. असं आमदार माधुरी मिसाळ यांनी म्हटलं आहे.

तसेच, मागील काही दिवसांमध्ये ज्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. त्या ज्यांना भाजपात फूट पाडायची आहे किंवा भाजपा नेतृत्वात फूट पाडायची आहे, त्यांच्याकडून केल्या जात असल्याचाही त्यांनी यावेळी आरोप केला. मागील पाच वर्षे आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कामं केलं. देवेंद्रजींनी देखील आम्हाला सर्वांना सोबत घेऊन पाच वर्षे सरकार चालवलं. सर्वांना एकत्र ठेऊन पक्ष चालवला व आम्ही सर्व एकत्र राहिलो. मात्र, आता मला असं वाटतं आहे की, अशा काही शक्ती आहेत की, ज्या पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना पक्षात फूट पाडून कुठली स्वतःची पोळी भाजायची आहे हे मला माहिती नाही. पण मला असं वाटतं की आम्ही सर्व एकत्र आहोत, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: That is personal opinion of mp kakade mla misal msr
First published on: 13-12-2019 at 16:44 IST