महापालिकेच्या ठरावाला केराची टोपली दाखवत हडपसर परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने उद्यान उभारण्यात आल्यानंतर झालेल्या टीकेमुळे नाव बदलण्याची नामुष्की ओढावलेल्या धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचे उदघाटन एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

हेही वाचा- भाजपकडून महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे कटकारस्थान; नाना पटोले यांची टीका

महापालिकेच्या मुख्य सभेने केलेल्या ठरावाला केराची टोपली दाखवत शिंदे समर्थक माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी हडपसर परिसरातील या उद्यानाला एकनाथ शिंदे उद्यान असे नाव दिले आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ ने ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध केले होते. त्याचे तीव्र पडसाद राजकीय क्षेत्रात उमटले. उद्यानाला दिलेल्या नावावरून टीका झाल्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की शिंदे यांच्यावर ओढविली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा शिंदेंचा पहिलाच पुणे दौरा वादग्रस्त ठरला होता. मी राज्याचा मुख्यमंत्री आहे. एखाद्या नगरसेवक किंवा कार्यकर्त्याने माझ्या नावाने जर उद्यान केले असेल तर ते मला मान्य नाही, त्यामुळे उद्यानाचे नाव बदलावे’, अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार उद्यानाचे नाव बदलून ते धर्मवीर आनंद दिघे करण्यात आले होते.

हेही वाचा- पुणे: कमी पटसंख्येच्या शाळा बंद नाही करण्यात येणार नाही; शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची स्पष्टोक्ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, स्वखर्चाने उद्यान उभारण्यात आले आहे. त्याबाबतच्या सर्व प्रशासकीय मंजुरी घेण्यात आली आहे. चुकीच्या विकासकामांचे उद्घाटन केले जाणार नाही, असा दावा बाळासाहेबांची शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी केला. महापालिकेच्या मुख्य सभेने २४ जुलै २००० मध्ये उद्यानांना देण्यात येणाऱ्या नावांबाबत ठराव केला आहे. या ठरावानुसार महापालिकेच्या उद्यानांना नाव देताना वैयक्तिक नावे देता येत नाहीत. राष्ट्रीय नेते, पर्यावरणशास्त्रज्ञ आणि वनस्पतिशास्त्रज्ञांची नावे उद्यानांना देण्यास परवानगी आहे.