पुणे : ‘या देशाचे नाव भारत हेच आहे. त्यामुळे इंडिया असे न म्हणता भारत असाच त्याचा उल्लेख करायला हवा. कोणत्याही प्राचीन शास्त्रामध्ये या देशाचा उल्लेख इंडिया असा केलेला आढळत नाही. केवळ ग्रीक साहित्यात इंडिका असे या देशाबाबत लिहिलेले दिसते. इंडिया हे नामकरण ब्रिटिशांनी केले आहे. त्यांनी भारतात आणलेली शिक्षण पद्धती नोकरशहा, कारकून आणि गुलामीची मानसिकता तयार करणारी आहे. त्यामुळे या देशाचा उल्लेख भारत असाच करायला हवा,’ असे मत प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक डॉ. नितीश भारद्वाज यांनी व्यक्त केले.

विधिलिखित संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘विधिलिखित ज्योतिष त्रिदशकोत्तर सोहळा -२०२५’ या कार्यक्रमाचा समारोप भारद्वाज यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. संस्थेतर्फे य. न. मग्गीरवार, सिद्धेश्वर मारटकर, सुरेंद्र पटवर्धन व गोविंद हेंद्रे यांना विधिलिखित ज्योतिष महर्षी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच ‘मच्छिंद्र नामदेव साळवी स्मृती निबंध स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणारे डॉ. उमेश सांगवीकर, श्रद्धा बेळगी आणि समीर खोत यांना पारितोषिके देण्यात आली. श्रोत्यांच्या मतदानातून निवडण्यात आलेले डॉ. दत्तप्रसाद चव्हाण, जितेंद्र वझे, डॉ. विजय महाजन, मुग्धा पत्की, प्राची मलमकर, शुभांगिनी पांगारकर व अपर्णा गोरेगावकर यांना विधिलिखित ज्योतिष महर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाचे माजी संचालक डॉ. सुभाष महाजन, डॉ. दत्तप्रसाद चव्हाण, विधिलिखित संस्थेचे संस्थापक आदिनाथ वैशाली साळवी आदी या वेळी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. भारद्वाज म्हणाले, ‘भारताची ज्ञान आणि ध्यान परंपरा मोठी आहे. मात्र, ती मोडायला निघालेल्या लोकांची संख्या अधिक दिसते आहे. त्याला सावरून घेण्याची आवश्यकता आहे.’