पुणे : सासू-सुनेत नकटी बोलल्याने वाद झाल्याने सुनेने थेट स्वयंपाक घरातील सुरीने सासूच्या हातावर वार केल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – गुऱ्हाळघरे अडचणीत; निर्बंध लादण्यास विरोध

हेही वाचा – पुणे : घोरपडे पेठेत मध्यरात्री सदनिकेत शिरून परप्रांतीय तरुणावर गोळीबार; तरुणाचा गोळीबारात मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संध्या अशोक मगर (वय ४५, रा. गणेशनगर, येरवडा) असे गुन्हा दाखल केलेल्या सुनेचे नाव आहे. याबाबत सासू मालनबाई परशुराम मगर (वय ७५) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संध्या आणि सासू मालनबाई घरात काम करत होत्या. त्या वेळी संध्या आणि मालनबाई यांच्यात वाद झाला. संध्या सासूला नकटी असे म्हणाली. त्यानंतर सासू मालनबाई ‘तूसुद्धा नकटी आहे’, असे तिला म्हणाल्या. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. संध्याने स्वयंपाक घरातील सुरीने सासूच्या हातावर वार केला. मालनबाईंच्या हाताला दुखापत झाली असून, पोलीस हवालदार देसाई तपास करत आहेत.