गणेश विसर्जन मिरवणुकीने वेग घेतला असून, लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य मिरवणूक संपण्याच्या मार्गावर आहे. या विसर्जन मार्गावरून आतापर्यंत २३८ मंडळे मार्गस्थ झाली असून महाराष्ट्र तरुण मंडळ हे शेवटचे मंडळ मार्गावर आहे. पोलिसांनी लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक सुरू केली आहे.
टिळक रस्त्यावरील मिरवणूक संपली आहे. लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणूक संपण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्र तरुण मंडळ हे शेवटचे मंडळ विसर्जन मिरवणूक मार्गावर आहे. दरम्यानच्या काळात पोलिसांनी लक्ष्मी रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे.