शहरातील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर करावे आणि त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबतच उपलब्ध मनुष्यबळात आवश्यकतेनुसार वाढ करावी, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिले. तसेच थकित मिळकत कर वसुलीबाबत १२ सप्टेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

हेही वाचा – पुणे : ऑप्टिंग आऊटच्या कार्यपद्धतीमध्ये एमपीएससीकडून सुधारणा

Due to summer the price of lemon continues to increase
उन्हामुळे लिंबाची दरवाढ कायम
All the Chief Executive Officers of the Zilla Parishad were given instructions regarding the recruitment of teachers Pune print news
शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया कधीपासून? शिक्षण विभागाने काय सांगितले?
Radio images of the Sun obtained by scientists pune news
शास्त्रज्ञांनी मिळवली सूर्याच्या रेडिओ प्रतिमा
seven injured after machinery in trailer
लष्कर भागात मोटारीची दहा दुचाकींना धडक; दुचाकीस्वार तरुण जखमी

शहरातील विकास कामांबाबत महानगरपालिकेत आयोजित आढावा बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘गणेशोत्सवात काळापूर्वी शहरातील खड्डे बुजविण्यसाठी पालिका प्रशासनाने तातडीने कामे पूर्ण करावीत. खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), कटक मंडळे यांनी समन्वयाने काम करावे. रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करावा. शहरातील प्रमुख पाच निवडक रस्त्यांसाठी अल्प मुदतीची निविदा काढून कामे त्वरित करावी. समान पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या योजनांची प्रभागनिहाय कामे तातडीने पूर्ण करा, जायका प्रकल्पाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून या प्रकल्पाची कामे ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरु होतील यासाठी योजना तयार करावी.

खा. गिरीश बापट, आ. भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, करसंकलन विभागाचे उपायुक्त अजित देशमुख, पाणीपुरवठा मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, माजी आमदार जगदीश मुळीक, युवा संकल्प अभियान समितीचे अध्यक्ष राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, गणेश बीडकर आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा – …त्यावेळेस मात्र पुन्हा आठ दिवस हंगामा माजलेला असेल – तानाजी सावंतांचा विरोधकांना इशारा!

मिळकत कराबाबत १२ सप्टेंबरला बैठक
महापालिकेकडून हजारो पुणेकरांना अचानक थकित मिळकतकर भरण्याबाबतचा ई-मेल किंवा मोबाइलवर लघुसंदेश मंगळवारी (२३ ऑगस्ट) पाठविण्यात आले. पालिका वर्षानुवर्ष देत असलेली ४० टक्के सवलत ऑगस्ट २०१९ पासून राज्य शासनाने रद्द केल्याने फरकाची ही रक्कम थकित मिळकत कर म्हणून वसूल करण्याबाबत महापालिकेने ई-मेल, लघुसंदेश पाठविले होते. मात्र, त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने वसुलीला तूर्त स्थगिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मिळकत थकीत कर वसुलीबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन १२ सप्टेंबर रोजी बैठक घेण्यात येईल, असेही पाटील यांनी या वेळी सांगितले.