पिंपरी: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीतील पाण्यावर फेसाचे थर साचले आहेत. थेरगावातील केजुदेवी बंधाऱ्याजवळ हे चित्र निर्माण झाले असून, महापालिका प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. पवना नदीची महापालिका हद्दीतील लांबी २४.३४ किलोमीटर, इंद्रायणी नदीची एकूण लांबी २०.८५ किलोमीटर आहे, तर मुळा नदी शहराच्या सीमेवरून १० किलोमीटर अंतर वाहते. तळवडेपासून चऱ्होलीपर्यंत इंद्रायणी नदीचे, तर किवळेपासून दापोडीपर्यंत पवना नदीतील प्रदूषण वाढले आहे. नदीलगतच्या भागात किवळे, पुनावळे, रावेत, ताथवडे, वाल्हेकरवाडी, थेरगाव, चिंचवडगाव, काळेवाडी, पिंपरी, दापोडी, पिंपळे गुरव, सांगवी, कासारवाडी व दापोडीपर्यंत पाण्याचे प्रदूषण वाढल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा… प्रवाशांचा वाचणार वेळ! पुणे विभागात रेल्वेचा वाढणार वेग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पवना नदीतील पाण्यावर सातत्याने फेस दिसत आहे. पावसाळ्यात आतापर्यंत तीन वेळा हे चित्र निर्माण झाले आहे. नागरिक बंधाऱ्यावर कपडे धुतात. कपडे धुतल्याने पाण्यावर फेस येतो, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

औंध-रावेत भागातील नाल्यांमध्ये टँकरने काही रसायनयुक्त पदार्थ सोडले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्यावर फेस साचला आहे. – संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता पर्यावरण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका