पिंपरी-चिंचवडमधील संत तुकाराम नगर येथे मेट्रोच्या मुख्य मार्गावरून पुणे मेट्रो धावली आहे. ओव्हरहेड वायर लावल्यानंतर त्यातून मेट्रोला करंट पास होतो का हे पाहण्यासाठी मेट्रोची ५०० मीटरपर्यंत चाचणी घेण्यात आली. .

मागील काही वर्षांपासून पुणे मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामध्ये सर्वाधिक पिंपरी-चिंचवड शहरात काम झाल आहे, अस म्हटलं तर वावग ठरणार नाही.   डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये नागपूरहुन मेट्रोची बोगी आणण्यात आली होती. मात्र,  त्यानंतर नामंतरावरून पिंपरी-चिंचवडच्या महापौर यांनी मेट्रोच्या संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. अखेर बोगी मेट्रोच्या मुख्य मार्गावर आणून ठेवत दुसऱ्या दिवशी पत्रकरांना बोलावून फोटोशूट करून घेतले. दरम्यान, मेट्रोच्या नावावरून मेट्रो चे संबंधित अधिकारी यांनी पिंपरी-चिंचवडचे नाव देण्यास काही हरकत नसल्याचे म्हटले.

ओव्हरहेड वायर ही जवळपास दीड किलोमीटर पर्यंत झाली आहे. त्याच ओव्हरहेड वायरचा करंट मेट्रोला पास होतो की नाही, हे पाहण्यासाठी अखेर ५०० मीटर मेट्रो धावली. त्यामुळे अधिक  गतीने व दूरपर्यंत मेट्रो कधी धावणार हा प्रश्न अद्यापही कायम आहे.