पुणे : राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी (२८ ऑगस्ट) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाने दहावीची परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्ट, तर बारावीची परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत घेतली. अतिवृष्टीमुळे तीन परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करून परीक्षा घ्यावी लागली. परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी-पालकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

हेही वाचा – VIDEO: गोष्ट पुण्याची भाग – पुण्यातील ‘रमणबाग’ नेमकी कशासाठी ओळखली जायची?; जाणून घ्या

हेही वाचा – पुणे : नगर रस्त्यावरील चार गुंड तडीपार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी ( २८ ऑगस्ट) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. http://www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर निकाल जाहीर होईल. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर विषयनिहाय गुण उपलब्ध होतील, या माहितीची प्रत घेता येईल. निकालानंतर गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.