देशाच्या आर्थिक सुरक्षेत आणि राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (गुरुवार) केले. देशाची सागरी अर्थव्यवस्था लोकांच्या हिताशी जोडली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोणावळा येथील भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी या प्रशिक्षण संस्थेला आज राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती ध्वज (प्रेसिडेंट कलर) प्रदान करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, नौदल अध्यक्ष  अ‍ॅडमिरल करमबीर सिंह उपस्थित होते.

राष्ट्रपती कोविंद म्हणाले, केवळ राष्ट्रीय सुरक्षाच नव्हे तर देशाच्या आर्थिक सुरक्षेत आणि राष्ट्रनिर्मितीच्या विस्तृत प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. देशाची सागरी अर्थव्यवस्था लोकांच्या हिताशी जोडली जात आहे. बहुतांश व्यापार समुद्र मार्गाने केला जात आहे. नौदल हे आपल्या समुद्री सामर्थ्याचे प्रमुख साधन आहे. समुद्री सीमांचे संरक्षण करण्यासाठी तसेच व्यापारी मार्ग सुरक्षित करण्यासाठी आणि नागरी आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यात नौदलाच्या धाडसी कार्याचा देशाला अभिमान आहे. भविष्यातही नौदलाच्या माध्यमातून निश्चितच गौरवास्पद कामगिरी घडेल, असा विश्वासही राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमास आयएनएस शिवाजी प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The role of the indian navy in the process of nation building is important president msr 87 kjp
First published on: 13-02-2020 at 13:52 IST