पुणे : कौटुंबिक वादातून सासू, सासरे, पत्नी तसेच नातेवाईकांनी जावयाच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना खराडी भागात घडली. या घटनेत जावई भाजला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लखन बाजीराव काळे ( वय ३२, रा. शिरूर) असे गंभीर भाजलेल्या जावयाचे नाव आहे. लखन काळे याने याबाबत चंदननगर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सासरे रणजीत ऊर्फ गेंड्या भोसले, सासू बासुंदी रणजीत भोसले, साडू अल्ताफ विजय काळे, लखनची पत्नी पेडम लखन काळे यांच्यासह नातेवाईकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> पुणे : फक्त शंभर रूपयासाठी महाविद्यालयीन तरुणाचा हातच..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन काळे आणि त्याची पत्नी पेडम यांच्यात वाद झाला होता. दोघे विभक्त झाले आहेत. काळे सायंकाळी खराडी परिसरात एका झाडखाली बसला होता. त्या वेळी त्याचे सासू, सासरे आणि नातेवाईक तेथे आले. पत्नीला का नांदवत नाही, अशी विचारणा करुन आरोपींनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरूवात केली. लखनला मारहाण करुन त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर तपास करत आहेत.