राज्यात आज सर्वत्र धुळवड साजरी केली जात आहे. हा रंगांचा सण अनेकजण आपल्या कुटुंबीय आणि मित्र परिवारांसह साजरा करत आहेत. तर, राज्यातील राजकीय धुळवड देखील पाहायला मिळत आहे. नेते मंडळी विविध मुद्य्यांवरून आपल्या विरोधकांवर निशाणा साधत आहेत. दरम्यान, भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील आज महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

“राज्य सरकारला रंगच राहिला नाही, सरड्यासारखं रंग बदलणार हे सरकार आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही कुठल्याही रंगात रंगा पण, आम्ही तुमचा खरा रंग महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणणारच.” अशी चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिंपरी-चिंचवडमध्ये धुळवडीच्या कार्यक्रमाप्रसंगी त्या आल्या होत्या. तेव्हा, त्यांच्याशी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिलांना सर्व ठिकाणी लढावं लागतंय, आज महिला या धुळवडीचा आनंद घेत असून त्यांनी असच आनंदी राहावं, अशी सदिच्छा देखील व्यक्त केली.