पुणे : राज्यात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. तीन डिसेंबरनंतर राज्यात दंगलीची मोठी शक्यता आहे. पोलीस ठाण्यांना सतर्कतेची सूचनाही देण्यात आली आहे. चार राज्यांतील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर काहीही होऊ शकते, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हणाले.

महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त फुले वाड्यात येऊन आंबेडकर यांनी अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. देशात मुस्लिम आणि ओबीसी समाजाला लक्ष्य केले जात आहे. समाजात अशांतता निर्माण केली जात असून आंदोलनाशी संबंध नसलेल्यांचा त्यासाठी वापर केला जात आहे, असा आरोप करतानाच आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत, असा दावाही आंबेडकर यांनी केला.

Prakash Ambedkar marathi news
“भाजपने हरवले; मग आम्ही त्यांची बी टीम कशी?”, प्रकाश आंबेडकर यांची विचारणा
Prakash Ambedkar on Pooja Khedkar
Prakash Ambedkar : “खटल्यापूर्वीच पूजा खेडकरला…”, प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “बनावट प्रमाणपत्र…”
arvind kejriwal low calorie diet allegation by delhi lg
Arvind Kejriwal : “अरविंद केजरीवाल जाणीवपूर्वक…”, तुरुंगातील आहारावरून नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांचा गंभीर आरोप!
Final hearing, Maratha reservation,
मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी ५ ऑगस्टपासून सुरू
monoj jarange replied to chandrakant patil
“तुम्हाला नातेवाईक आणि सगेसोयरे यांच्यातील फरक कळतो का?” मनोज जरांगेंचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर!
Vasant More Joins Shivsena UBT
राज ठाकरेंचा शिलेदार आता उद्धव ठाकरेंसोबत; वसंत मोरेंचा तीन महिन्यांत प्रकाश आंबेडकरांना ‘जय महाराष्ट्र’!
150th birth anniversary of Chhatrapati Shahu Maharaj by Dr Babasaheb Ambedkar Research and Training Institute BARTI
सचिवांच्या नातेवाईकाला पावणेदोन कोटींचे कंत्राट! शाहू महाराज जयंतीचा नियोजित कार्यक्रम असतानाही तातडीची निविदा
dikshabhoomi protest
नागपूर : आंबेडकर अनुयायी आक्रमक अन् अवघ्या तासाभरात विधानभवनातून स्थगिती…दीक्षाभूमीच्या भूमिगत वाहनतळविरोधात आंदोलन

हेही वाचा – ललित पाटील प्रकरणात ससूनमधील कर्मचारी अटकेत

ते म्हणाले की, तीन दिवसांपूर्वी मुस्लिम संघटनांची मुंबई येथे बैठक झाली. मुस्लिम संघटना आठ डिसेंबर रोजी पॅलेस्टाईन या विषयावर सभा घेणार आहेत. मुस्लिम समाजाची सभा असल्याने भाजप त्याकडे वेगळ्या नजरेने पहात आहे.

हेही वाचा – आता थांबायचं नाही, हक्कावर गदा येत असेल तर लढायचं – छगन भुजबळ

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कारागृहातून मीच बाहेर काढले. मात्र, त्यांनी त्याबाबत माझे कधी आभार मानले नाहीत. मलाही कोणाची गरज नाही. मंडल आयोगाचा इतिहास पाहिल्यावर वस्तुस्थिती कळेल. इतिहास पाहिला तर मीच ओबीसीचा जनक असल्याचे दिसेल, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.