पुणे : शहरात वेगवेगळ्या भागांत झालेल्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी दाेन लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.नगर रस्त्यावरील पेरणे फाटा परिसरात एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील ९२ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत श्रीराम निंबा खैरनार (वय ३९, रा. लक्ष्मीनगर, पेरणे फाटा, नगर रस्ता) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खैरनार कुटुंबीय १४ मे रोजी बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील ९२ हजारांची रोकड चोरून नेली. खैरनार कुटुंबीय गावाहून परतल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे तपास करत आहेत.

हवेली तालुक्यातील डोंगरगाव परिसरात एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिने, तसेच रोकड असा ८२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत अनिल महादू गायकवाड (वय ३५, रा. डोंगरगाव, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी गायकवाड यांच्या घरासमोर लावलेली दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक वंजारी तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हडपसर भागात घराचे कुलूप तोडून कपाटातील ७० हजारांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत श्रीनिवास दुर्गादास नंदे (वय ३५) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी सकाळी नंदे कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून रोकड चोरून नेली. सहायक फौजदार जांभळे तपास करत आहेत.