भारत निवडणुक आयोगाच्या शिफारशीनुसार मतदार यादीला आधार जोडण्याची मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत शहरासह जिल्ह्यातील साडेतीन लाख पुणेकरांनी मतदार यादीला आधार जोडणी केली आहे. मतदार यादीतील तपशीलाला आधार जोडणी ऐच्छिक आहे.जिल्ह्यात २१ विधानसभा मतदार संघांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत तसेच ऑनलाइन पद्धतीने १ ऑगस्टपासून आधार जोडणीचे काम सुरु आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत एकूण ७८ लाख ६९ हजार २७६ इतके मतदार आहेत. त्यापैकी आतापर्यंत तीन लाख ८२ हजार ३५१ मतदारांची आधार जोडणी करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने इंदापूर, आंबेगाव, भोर, खेड, मावळ या ग्रामीण भागातील विधानसभा मतदार संघातील मतदारांनी शहरी मतदार संघातील मतदारापेक्षा चांगला प्रतिसाद दिला आहे, असे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> पुणे : ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी ; तीन लाखांचा ऐवज लंपास ,कात्रजमधील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मतदार यादीतील विद्यमान मतदारांना त्यांचा आधार क्रमांक मतदार यादीच्या तपशीलाशी जोडण्यासाठी अर्ज क्र. सहा-ब भारत निवडणुक आयोगाच्या www.nvsp.in या संकेतस्थळ किंवा ‘वोटर हेल्पलाइन’ या मोबाइल उपयोजनद्वारे (ॲप) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदार यादीतील तपशीलाला आधार जोडणी करण्याबाबत ११ सप्टेंबरला जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर आधार जोडणीबाबतत खास शिबिर आयोजित करण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील मतदारांनी आपला आधार क्रमांक मतदार यादीच्या तपशीलाशी जोडण्यासाठी उत्स्फुर्तपणे सहभाग द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.