पुणे : बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस गोवा आणि दक्षिण कोकण किनारपट्टीवर मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहील.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढला आहे. हे वारे तेलंगणा, कर्नाटकातून पुढे वाटचाल करून दक्षिण कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस गोवा आणि दक्षिण कोकणातील प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात बाष्पयुक्त वाऱ्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण होऊन किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहण्याचा आणि किमान तापमान स्थिर राहण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा – पुणे : स्ट्रक्चरल ऑडिटवर सीओईपीने दाखवले महामेट्रोकडे बोट

हेही वाचा – पुणे : खासगी बसचे भाडे महागले! एसटीची सेवा बंद असल्याने प्रवाशांची लूट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात गुरुवारी सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद जळगावात १०.९ अंश सेल्सिअस झाली आहे. तर सर्वाधिक कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस सांताक्रुझ येथे होते. पुढील काही दिवस कमाल-किमान तापमान स्थिर राहण्याचा अंदाज आहे.