पुण्यातील तळजाई टेकडीवर मैत्रिणीसोबत फिरायला गेलेल्या युवकाच्या खून प्रकरणात सहकारनगर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. साहिल चांगदेव कसबे (वय १९, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी करण उर्फ सोन्या रवि वाघमारे (वय १८, रा. बिबवेवाडी), गौरव गोकुळ केंद्रे (वय २०, शिवरायनगर, बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच साथीदार प्रथमेश पवार (वय २०) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

हेही वाचा- चंद्रकांत पाटलांवर शाईफेकीच्या घटनेवर भाजपाची पहिली प्रतिक्रिया, ‘यामागे कोणाचा मेंदू…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुरुवारी (८ डिसेंबर) सायंकाळी साहिल एका मैत्रिणीबरोबर तळजाई टेकडीवर फिरायला गेला होता. त्यावेळी आरोपींनी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या साहिलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी तपास करुन पसार आरोपी वाघमारे, केद्रे यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पासलकर तपास करत आहेत.