पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मोर्चा काढला असून, पुणे पोलिसांकडून मोर्चाच्या मार्गावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. एक हजार पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या, दंगल नियंत्रक पथक, गृहरक्षक दलाचे ८०० जवान तैनात राहणार आहेत.

नगर रस्तामार्गे मोर्चा कोरेगाव भीमा येथे येणार आहे. कोरेगाव भीमा परिसराचा समावेश पुणे पोलीस आयुक्तालयातील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत होतो. २३ जानेवारी रोजी मराठा समाजाचा मोर्चा खराडी-वाघोली परिसरात मुक्कामी असणार आहे. वाघोली येथील आर. के. फार्मच्या मोकळ्या जागेत मुक्काम असणार आहे. तेथे एक हजार प्रसाधन गृह, रुग्णवाहिका, १०० पाण्याचे टँकर, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली.

हेही वाचा – महिलेचा खून करून मृतदेह जमिनीत पुरल्याचा प्रकार उघड; पतीसह दोघे अटक; दीर फरार

हेही वाचा – पुणे : विठ्ठल शेलारची दहशत मोडीत काढण्यासाठी धिंड; पोलिसांची न्यायालयात माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्यासह दोन पोलीस उपायुक्त, सहा सहायक पोलीस आयुक्त, २८ पोलीस निरीक्षक, १२३ सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, तसेच एक हजार पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या बंदोबस्तास राहणार आहेत. २४ जानेवारी रोजी मोर्चा मुंबईकडे मार्गस्थ होणार असून, लोणावळा येथे मुक्कामी असणार आहे.