धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन शहरात लागू करण्यात आलेली पाणीकपात शनिवारपासून (२८ जून) लागू होत असून पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पाणीकपातीमुळे संपूर्ण शहराला शनिवारपासून एक वेळ पाणीपुरवठा केला जाईल. मध्य वस्तीतील सर्व पेठांमध्ये सकाळी पाच ते नऊ या वेळेत पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शहरातील पाणीकपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे शहरासाठी जे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे ते शुक्रवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार करण्यात आलेले नियोजन पुढीलप्रमाणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वारगेट पाणीपुरवठा विभाग-
१) मध्य पुणे, पेठा व परिसर.
मध्य वस्तीतील सर्व पेठा- सकाळी ५ ते ९.
मंगळवार पेठ, गंज पेठ, महात्मा फुले पेठ, सोमवार, रास्ता पेठ, पॉवर हाऊस गुरुवार, भवानी पेठ, काशेवाडी, कसबा पेठ, गुरू नानकनगर, घोरपडे पेठ, एकबोटे कॉलनी, लोहियानगर, मालधक्का परिसर, कडबा कुट्टी परिसर, राजेवाडी- सकाळी ५ ते ९.
दांडेकर पूल, नवी पेठ, सर्वेक्षण क्रमांक १३३, राजेंद्रनगर, म्हात्रे पूल परिसर, स. प. महाविद्यालय परिसर, रामबाग कॉलनी, लोकमान्यनगर- सकाळी ५ ते ९.
मनपा कॉलनी क्रमांक ८ (गंज पेठ काही भाग), बलवार आळी- सकाळी ११ ते २.
हरकानगर, मनपा कॉलनी क्रमांक ७, १८० घोरपडे पेठ- सायंकाळी ५ ते ८.
गुरुवार पेठ  (अंशत:), घोरपडे पेठ  (अंशत:), शुक्रवार पेठ  (अंशत:)- सायंकाळी ५.३० ते ९.
पानमळा वसाहत, जयदेवनगर, नवश्यामारुती परिसर, गणेश मळा, सर्वेक्षण क्रमांक १३०- सायंकाळी ५.३० ते ९.३०
२) बिबवेवाडी, मार्केट यार्ड, महेश सोसायटी व परिसर.
वसंतबाग, अटल सोसायटी, कोठारी ब्लॉक, मार्केट यार्ड, हमालनगर, इंदिरानगर, महर्षिनगर, डायस प्लॉट, सॅलिसबरी पार्क, ढोलेमळा, श्रेयस सोसायटी, पारिजात सोसायटी, अनिकेत सोसायटी, आंबेडकर वसाहत, धवलगिरी, वास्तुनगर, झाला कॉम्प्लेक्स, केंजळेनगर, रम्यनगरी, पितळेनगर, हाईडपार्क, वैभव सोसायटी, महेश सोसायटी, दामोदरनगर, संत एकनाथनगर, औद्योगिक वसाहत- सकाळी ५ ते ९.
३) चिंतामणीनगर, अप्पर इंदिरानगर व परिसर.
क्रिसेंट हायस्कूल, विष्णू विहार, सूर्यप्रभा गार्डन, चिंतामणीनगर भाग १ व २, अप्पर इंदिरानगर, जागडेवस्ती, बुऱ्हाणी कॉलनी, पितळेनगर, सिटी पार्क, न्यू ईरा सोसायटी, विद्यानगर कॉलनी, गंगाधाम, गगन गॅलेक्सी, महावीर फर्निचर व भाग- दुपारी १२ ते ४.
लुंकड हायलॅन्ड, विद्यानगर कॉलनी, संदेशनगर- सायंकाळी ६ ते ९.
४) लक्ष्मीनगर, म्हाडा वसाहती, शिवदर्शन व परिसर.
म्हाडा वसाहती, लक्ष्मीनगर, पर्वती गावठाण, शिवदर्शन, आंबेडकर वसाहत, संध्या सोसायटी, शिरीष सोसायटी, गवळीवाडा, संजयनगर वसाहत, सारंग सोसायटी, तावरे बेकरी, निर्मलबाग, पर्वती दर्शन- सकाळी ५ ते ९.
५) मित्र मंडळ, संतनगर व परिसर.
वाळवेकरनगर, मित्र मंडळ कॉलनी, वेलणकर कॉलनी, संतनगर, राजर्षी शाहू सोसायटी, महावीर पार्क, सहकारनगर क्रमांक २, मोरेवस्ती- सकाळी १० ते ४.
६) महर्षिनगर व परिसर.
ऋतुराज सोसायटी, मोतीबाग सोसायटी, प्रेमनगर सोसायटी, सुपाश्र्वनाथ सोसायटी, आदर्शनगर सोसायटी, आदिनाथ सोसायटी, महर्षिनगर व परिसर- दुपारी ४ ते ९.
७) सहकारनगर व परिसर.
सहकारनगर क्रमांक १ पोलीस स्टेशन परिसर, गुरुराज सोसायटी, गाडगीळ उद्यान परिसर- सायं. ७ ते १०.
८) मुकुंदनगर, महर्षिनगर, शंकरशेठ रस्ता परिसर- सकाळी ५ ते ९.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Time table for one time water supply
First published on: 28-06-2014 at 03:32 IST