पुणे : सासरकडील छळाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघोली परिसरात घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू, नणंदेविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

प्रीती संजय शिंदे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती संजय सखाहरी शिंदे, सासू इंदूमती शिंदे (दोघे रा. ऐश्वर्य लक्ष्मी सोसायटी, वाघोली, नगर रस्ता), नणंद प्रतिभा गणेश माळोदे (रा. आडगाव, नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रीतीचे वडील मोहन विष्णू मते (वय ४७, रा. पार्थ रो हाऊस, आडगाव, जि. नाशिक) यांनी याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रीतीचा संजय शिंदे याच्याशी डिसेंबर २०२१ मध्ये विवाह झाला होता.

हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?

हेही वाचा – मावळमध्ये महायुतीतील तिढा वाढला

हेही वाचा – “त्यांच्याकडे पहिलवान असले, तर आमच्याकडे..”, रवींद्र धंगेकर यांचा मोहोळ यांना टोला; शरद पवारांची घेतली भेट

संजय खासगी कंपनीत कामाला आहे. विवाहानंतर किरकोळ कारणांवरुन तिचा छळ सुरू करण्यात आला. तिला टोमणे मारण्यात आले. छळ असह्य झाल्याने तिने ओढणीने गळफास घेतल्याची घटना वाघोलीतील राहत्या घरात घडली. तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक वंजारी तपास करत आहेत.