राहुल खळदकर

पुणे : डेक्कन जिमखाना भागातील पीएमपी स्थानक ते भिडे पूल दरम्यान महापालिकेकडून पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुढील दोन महिने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. गरज भासल्यास केळकर रस्तामार्गे भिडे पुलावरुन डेक्कन जिमखान्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

डेक्कन जिमखाना येथील पीएमपी स्थानक ते भिडे पूल दरम्यान पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सोमवारपासून (१६ ऑक्टोबर) सुरू करण्यात येणार आहे. हे काम साधारणपणे १५ डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. गरज भासल्यास केळकर रस्तामार्गे भिडे पुलावरुन डेक्कन जिमखान्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

आणखी वाचा-मुंबई ‘एनसीबी’चे पुणे जिल्ह्यात छापे; जुन्नर, शिरूर परिसरातून २०० किलो ‘अल्प्राझोलम’ जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केळकर रस्तामार्गे डेक्कन जिमखान्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन मगर यांनी केले आहे. केळकर रस्त्यावरुन जंगली महाराज रस्त्याकडे जाणारे , तसेच जंगली महाराज रस्त्यावरुन केळकर रस्तामार्गे नारायण पेठेकडे येणाऱ्या वाहनचालकांनी शक्यतो गाडगीळ पुलाचा (झेड ब्रीज ) वापर करावा. भिडे पूल, सुकांता हाॅटेल, खाऊ गल्लीमार्गे जंगली महाराज रस्त्याने वाहनचालकांनी इच्छितस्थळी जावे.