शिवाजीनगर न्यायालय परिसरातील कामगार पुतळा परिसरात मेट्रो मार्गावर लोखंडी ढाचा (गर्डर) टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. रविवारपासून (१ जानेवारी) या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असून मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतूक १९ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा- कोरेगाव भीमा परिसरात कडक बंदोबस्त; ड्राेन कॅमेऱ्यांची नजर; ७० जणांना सोहळ्याच्या ठिकाणी येण्यास मनाई

bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
Traffic Routes Altered as Nashik s CBS to Canada Corner Road Undergoes 18 Month Concreting Work
काँक्रिटीकरणासाठी नाशिकमधील आठ रस्ते बंद – सीबीएस- कॅनडा कॉर्नर मार्गावर एकेरी वाहतूक
Navi Mumbai Municipality Expands Waste Management Scope Introduces waste e Transportation Syste
नवी मुंबई : लवकरच कचऱ्याची ई-वाहतूक सुविधा, कचरा वाहतूक व संकलनासाठी अखेर निविदा प्रसिद्ध
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे. शिवाजीनगर न्यायालयाकडून पुणे स्टेशनकडे जाणारी वाहने कामगार पुतळा येथील पुलावरुन मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकाकडे जातात. या भागात मेट्रो मार्गिकेवर लोखंडी गर्डर टाकण्याचे काम रविवारपासून हाती घेण्यात येणार असून १९ जानेवारीपर्यंत हे काम सुरू राहणार आहे, असे पोलीस उपायुक्त मगर यांनी कळविले आहे.

हेही वाचा- पुणे: राज्य बँकेत ३० वर्षांनंतर भरती प्रक्रिया; ८६ जणांना नेमणुकीची पत्रे

वाहनचालकांनी कामगार पुतळा, शिवाजीनगर न्यायालय प्रवेशद्वार क्रमांक चार, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातून इच्छितस्थळी जावे तसेच वेधशाळा चौकातून डावीकडून वळून अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, प्रादेशिक परिवहन चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.