तळेगाव ढमढेरे ते जेजुरी राष्ट्रीय मार्ग क्रमांक ११७ या रस्त्याचे मजबुतीकरण, तसेच शिंदवणे घाटमाथा येथील पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे शुक्रवारपासून (२४ मार्च) २९ एप्रिल या कालावधीत वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक सासवड- पिसर्वे-टेकवडी-बोरीऐंदी आणि सासवड-वाघापूर चौफुला-माळशिरस-यवत या मार्गे वळविण्यात आली आहे.
हेही वाचा >>>भाजपच्या सरचिटणीसाला मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सचिन दोडके यांच्यावर गुन्हा
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रसृत केले आहेत. नागरिकांनी वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक कोंडी तसेच संभाव्य अपघात टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.