महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यातर्फे अनुसूचित जातीच्या उमेदवारांना नवउद्यमीसाठी सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलेल्या अनुसूचित जातीतील पात्र उमेदवारांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी शशिकांत कुंभार यांनी दिली.

हेही वाचा >>>पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त विधान; पुण्यात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात पुतळा जाळून निषेध

Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
Babasaheb Ambedkar Research and Training Institute
बार्टीचे अधिकारी निघाले लंडनला! ग्लोबल भीमजयंतीच्या नावाखाली वंचित विद्यार्थ्यांच्या पैशाचा…
teacher built a democratic gudhi for Public awareness and to increase voter turnout
शिक्षकाने उभारली चक्क लोकशाही गुढी! मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पती-पत्नीकडून जनजागृती
Barty, Sarathi
बार्टी, सारथी, महाज्योतीची स्वायत्तता धोक्यात! प्रशिक्षणासाठी आठ खासगी संस्थांची निवड होणार

अनुसूचित जातीतील उमेदवारांना नवउद्यमी प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था यांनी सामंजस्य करार केला आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था १९८८ पासून उद्योजकता विकासासाठी प्रशिक्षणाच्या माध्यमातून कार्यरत आहे. या संस्थेमार्फत आतापर्यंत महाराष्ट्रातील १८ ते ४५ वयोगटातील लाखो युवक, युवतींना १०० हून अधिक स्वयंरोजगारांचे प्रशिक्षण प्रदान करण्यात आले आहे. त्यातील बहुतांश प्रशिक्षणार्थीना बँकांकडून कर्ज मिळवण्यासाठी मार्गदर्शन पुरवण्यात आले असून त्यामुळे नवउद्योजकांनी स्वतःचे उद्योग सुरू केले आहेत.

हेही वाचा >>>“शिंदे-फडणवीस यांची विकासाची बुलेट ट्रेन निघाल्याने…”, महाविकास आघाडीच्या मोर्चावरून बावनकुळेंचा खोचक टोला!

नवउद्यमी प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अनु. जातीतील उमेदवारांनी https://mced.co.in/Training_Details/?id=2785 या संकेतस्थळावर नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी वरिष्ठ प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र पुणे येथे किंवा ९४०३०७८७५२ या क्रमाकंकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले.