लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: निष्ठा या शिक्षक, मुख्याध्यापकांसाठीच्या उपक्रमाचा २०२१-२२ मध्ये माध्यमिक शिक्षणापर्यंत विस्तार करण्यात आला. त्याला मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र ओळख स्वरूप देण्यात आले. या अंतर्गत आतापर्यंत ३५ लाख पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणात शिक्षकांची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचा दर्जा वाढवण्यावर भर देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त सचिव लामचोंघोई स्वीटी चांगसन यांनी दिली.

जी-२०परिषदेच्या निमित्ताने ‘मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र ओळख’ या विषयावरील राष्ट्रीय परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झाली. त्यात ‘मिश्र स्वरूपात शिक्षकांची क्षमतावृद्धी आणि प्रशिक्षण’ या विषयावर चर्चेत चांगसन बोलत होत्या. शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिव अर्चना शर्मा अवस्थी आदी या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांनी आपापल्या राज्यांच्या मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र पद्धतींचे सादरीकरण केले.

आणखी वाचा-जनता पक्षाचा प्रयोग आताही होऊ शकतो, शरद पवार यांचे सूचक संकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिकण्याचा अनुभव, परिणामकारकता आणि शिक्षणाची पोहोच वाढवण्यासाठी पारंपरिक दृष्टिकोन आणि ऑनलाइन शिक्षणाचा मेळ मिश्र शिक्षण पद्धतीत घातला जात असल्याचे चांगसन यांनी अधोरेखित केले. मिश्र शिक्षण पद्धती प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी, बदलांशी जुळवून घेण्यासाठी शिक्षकांनी कौशल्ये, ज्ञान आणि अध्यापनशास्त्रीय दृष्टिकोनातून सुसज्ज असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.