मराठा चेंबर ॲाफ कॅामर्स, इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रीकल्चरतर्फे (एमसीसीआयए) लघु उद्योग, नवउद्यमींना कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी विशेष प्रशिक्षण वर्ग १ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचे प्राध्यापक अजित जावकर मार्गदर्शन करणार आहेत.

हेही वाचा >>>पुणे : ज्येष्ठ नागरिकाची पावणेसहा लाख रुपयांची फसवणूक

कृत्रिम बुध्दिमत्तेचीची संकल्पना, लघु आणि मध्यम उद्योग, नवउद्यमींनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याविषयीची रणनीती आणि त्याचा उद्योगांच्या दैनंदिन व्यवहारात वापर करून स्पर्धात्मकता टिकवण्याबाबतचे मार्गदर्शन या प्रशिक्षण वर्गात केले जाईल. उद्योजक, उद्योगांमधील माहिती तंत्रज्ञान अधिकारी, महाविद्यालयीन शिक्षक या सर्वांसाठी हा प्रशिक्षण वर्ग उपयुक्त ठरेल. प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी https://tinyurl.com/yh3j67ju या दुव्याद्वारे नावनोंदणी करता येईल, अशी माहिती एमसीसीआयएने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.