लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: उद्योगनगरीचा पाहुणचार घेऊन श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी पुण्याकडे मार्गस्थ झाला. पिंपरी-चिंचवडकरांनी भक्तिभावाने पालखीला निरोप दिला. पहाटेपासूनच नागरिक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दुतर्फा थांबलेले होते. पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Shahu Vichar Darshan Padyatra, Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj, Rajarshi Shahu Maharaj s Centenary Golden Jubilee , Centenary Golden Jubilee, Rajarshi Shahu Maharaj Kolhapur, Kolhapur, dr jai singh rao pawar,
शाहू विचार दर्शन पदयात्रेद्वारा विविधांगी कार्याचा जागर
Departure of Sri Sant Tukaram Maharaj palanquin on 28th June
पिंपरी : श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २८ जूनला प्रस्थान; ‘असा’ आहे पालखी सोहळ्याचा कार्यक्रम
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
Hasan Mushrif
आम्हालाही प्रत्युत्तर द्यावे लागेल – हसन मुश्रीफ यांचा कोल्हापुरातील ‘मविआ’ला इशारा

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी सायंकाळी उद्योगनगरीत दाखल झाला होता. आकुर्डीतील विठ्ठल रखुमाई मंदिरात दुसरा मुक्काम झाला. रात्री पालखी तळावर कीर्तन झाले. त्यानंतर जागर झाला. सोमवारी पहाटे संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या उपस्थितीत मंदिरात महापूजा झाली. महापालिका आयुक्त शेखर सिंह, त्यांच्या पत्नी ईशा सिंह यांनी पादुकांचे पूजन केले. काकड आरती झाली. त्यानंतर सोहळा मार्गस्थ झाला. पहाटेपासूनच नागरिक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दुतर्फा थांबलेले होते. खंडोबा माळ चौकातून सोहळा मुंबई-पुणे महामार्गाने पुण्याकडे निघाला. साडेसातच्या सुमारास पालखी खराळवाडी येथील विठ्ठल मंदिरात सकाळच्या विसाव्यासाठी थांबली. दिंड्याही थांबल्या. तिथे न्याहरी केल्यानंतर पालखी सोहळा पुढे निघाला.

आणखी वाचा-पिंपरी: साहित्यिकांच्या दिंडीने वेधून घेतले भाविकांचे लक्ष

साडेअकराच्या सुमारास पालखी दापोडी येथे पोहोचली. दुपारची विश्रांती घेतल्यानंतर हॅरीस पुलावरून पुण्यातील बोपोडीत प्रवेश केला. आकुर्डीपासून दापोडीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा थांबून भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. भक्तीमय वातावरणात पिंपरी-चिंचवडमधील भाविकांनी पालखीला निरोप दिला.