बेकायदा वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना फरासखाना पोलिसांनी पकडले. बुधवार पेठ परिसरात ही कारवाई करण्यात आली.

ज्वेल अख्तर अली खान (वय २६) आणि मायमुना अख्तर शिउली (वय २९, दोघेही रा. बांगलादेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार नारायण चलसाणी यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खान आणि शिउली यांच्या विरोधात पारपत्र अधिनियम आणि परकीय नागरिक कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

pune police warning goons after Salman Khan House Firing Case
सलमान खानच्या घराजवळ गोळीबार, पुण्यातल्या ‘भाईं’ची झाडाझडती
two accused arrested in Salman Khan house firing case (1)
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक, पोलिसांनी व्हिडीओ केला शेअर
High Court restrains demolition of loom department in Mafatlal
मफतलालमधील यंत्रमाग विभाग पाडण्यास उच्च न्यायालयाचा मज्जाव
loksatta analysis 30 Indians promised high paying jobs in thailand duped into scams in laos
विश्लेषण: थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन… लाओसमध्ये बेकायदा रवानगी… ३० भारतीय तरुणांची कशी झाली सुटका?

हेही वाचा – राज्यातील १८९ कैद्यांची शिक्षा माफ, प्रजासत्ताक दिनी कारागृहातून मुक्तता

हेही वाचा – पुणे : कारागृहातील कैद्यांना आता अंघोळीसाठी गरम पाणी

खान आणि शिउली बेकायदा वास्तव्य करत होते. त्यांच्याकडे अधिकृत कागदपत्रे नव्हती. याबाबतची माहिती फरासखाना पोलिसांना मिळाल्यानंतर बुधवार पेठेतील क्रांती हाॅटेल परिसरातून दोघांना ताब्यात घेण्यात आले. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. तपासासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने दोघांना कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून, या प्रकरणाचा फरासखाना पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.