पुणे : अमरनाथ येथे शुक्रवारी झालेल्या ढगफुटीमध्ये पुण्यातील दोघा यात्रेकरूंचा मृत्यू झाला. त्यामध्ये एक पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. प्रदीप नाथा खराडे (रा.पिंपरी), सुनीता महेश भोसले (रा.वडगाव बु.) अशी दोघांची नावे आहेत. यातील खराडे यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.

पुण्यातून २५५ यात्रेकरूंचा समूह गजानन महाराज खेडेकर आणि गजानन महाराज सोनवणे यांच्या सोबत अमरनाथ येथे यात्रेस गेला होता. खराडे हे गुरूकृपा ट्रॅव्हल्समार्फत खासगी गाडीने अमरनाथ यात्रेला गेले होते. ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना अमरनाथ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान पहाटे चार वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह खासगी रुग्णवाहिकेतून पुण्याकडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्यासोबतचे सर्व यात्रेकरू सध्या बलताल बेस कॅम्पमध्ये सुखरूप आहेत. सर्व यात्रेकरू रविवारी (१० जुलै) परतीचा प्रवास सुरू करणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

Former Pune Mayor Mohan Singh , Former Pune Mayor Mohan Singh Rajpal Passes Away, former pune mayor passed away, marathi news, pune news, pune former ncp mayor Mohan Singh,
माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन
yavatmal, Cows Die After Eating Stale Food, karykarta s Birthday Party, election Campaign Rally, pandharkawada taluka, yavatmal district, yavatmal news, maha vikas aghadi, lok sabha election, election campaign, sanjay deshmukh, marathi news, yavatmal news,
शिळे अन्न खाल्ल्याने सहा गायींचा मृत्यू, वाढदिवसाचे भोजन जनावरांच्या जीवावर बेतले; पांढरकवडा तालुक्यातील घटना
painganga river three drowned marathi news
नांदेड: पैनगंगा नदीपात्रात बुडून तिघांचा मृत्यू; मृतांमध्ये चुलतीसह दोन पुतणी, माहुर तालुक्यातील घटना
A woman and two little girls drowned in Panganga river yawatmal
महिलेसह दोन लहान मुलींचा पैनगंगा नदीत बूडून मृत्यू; आर्णीतील कवठा बाजार येथील घटना

दरम्यान, गजानन सोनवणे यांच्या समवेत यात्रेकरू व व्यवस्थापक असे मिळून ५५ जण अमरनाथ येथे गेले होते. त्यांच्या समूहातील सुनीता भोसले यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्यांच्या सोबत त्यांचे पती महेश भोसले व नणंद प्रेमा शिंदे हे देखील आहेत. सुनीता यांचा मृतदेह जम्मू येथे हेलिकॉप्टरने घेऊन जाण्यात आला आहे. तर, समूहातील इतर २० यात्रेकरू बालतान पार्किंग तंबूत सुरक्षित पोहोचले आहेत. उर्वरीत ३५ पैकी ३४ यात्रेकरू सैन्यदलाच्या कॅम्पमध्ये सुरक्षित आहेत, असे आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले.

संपर्क सुरू

अमरनाथमध्ये ढगफुटीमुळे मोठा पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत. पुरात अडकलेल्या भाविकांना वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये काही जणांचा मृत्यू झाला आहे. अमरनाथ यात्रेसाठी पुण्यातून गेलेल्या भाविकांपैकी काही जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत होती. शनिवारी दिवसभर जिल्हा आपत्ती कक्षातून मंत्रालयातील आपत्कालीन कक्षाशी संपर्क सुरू होता. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सायंकाळी दोन जणांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली.