लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल दिसून आला. गुढीपाडव्याच्या आधीच्या पंधरवड्यात नागरिकांनी ११ हजार ९६४ वाहनांची खरेदी केली. यंदा दुचाकी विक्रीत वाढ झाली असली तर मोटारींच्या विक्रीत घट झालेली दिसून आली आहे.

Best Selling SUV
मारुतीची Wagon R नव्हे तर Tata ची ‘ही’ स्वस्त SUV खरेदीसाठी उडतेय ग्राहकांची झुंबड, ३० दिवसात १८ हजाराहून अधिक गाड्यांची विक्री
Anant Ambani Radhika Merchant wedding
अनंत-राधिकाच्या लग्नामुळे मुंबईतल्या हॉटेलांचे दर वाढले, तब्बल ‘इतक्या’ हजारांनी वाढलं एका दिवसाचं भाडं
Powering E Vehicles from Homemade Battery Packs  Ola Electric print eco news
लवकरच स्वनिर्मित बॅटरी संचातून ई-वाहनांना ऊर्जा – ओला इलेक्ट्रिक ; ८३५ कोटींच्या गुंतवणुकीच्या ‘गिगाफॅक्टरी’तून पुढील वर्षारंभी उत्पादन अपेक्षित
32 thousand crores fundraising through ipo in six months boom in ipo
विश्लेषण : सहा महिन्यांत ३२ हजार कोटींची निधी उभारणी… आयपीओ बाजारातील तेजी कुठवर?
More than eleven and a half thousand houses sold in Mumbai in June
जूनमध्ये मुंबईत साडेअकरा हजारांहून अधिक घरांची विक्री, मागील बारा वर्षातील जूनमधील सर्वाधिक गृहविक्री
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : जीएसटी कक्षेत आणल्यास इंधन स्वस्त होईल
Ganja, Charas, MD, thane,
ठाण्यातील तरुणाईला गांजा, चरस आणि एमडीचा विळखा; मागील दीड वर्षांत चार हजाराहून अधिक जणांविरोधात गुन्हे दाखल
Nagpur, schedule, metro,
नागपूर : वेळापत्रकात बदल करताच मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ

यंदा गुढीपाडव्याचा मुहूर्त डोळ्यासमोर ठेवून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी केली. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील आकडेवारीनुसार ७ ते २१ मार्च या पंधरवड्यात ११ हजार ९६४ वाहनांची नोंदणी झाली आहे. मागील वर्षीपेक्षा ही संख्या सुमारे पाचशेने अधिक आहे. मागील वर्षी गुढीपाडव्याच्या आधी १९ मार्च ते २ एप्रिल या पंधरवड्यात ११ हजार ४६६ वाहनांची नोंदणी झाली होती. यंदा दुचाकींची विक्री सर्वाधिक असून, ती ८ हजार ११ आहे. त्या खालोखाल मोटारींची विक्री २ हजार ९३३ आहे. मालवाहतुकीच्या वाहने ३८९, रिक्षा २६७, बस २१ आणि इतर वाहने २७७ अशी विक्री झाली.

आणखी वाचा- पुणे: ई मेल, संकेतस्थळ पत्ता आता प्रादेशिक भाषांमध्ये देवनागरी लिपीपासून सुरुवात

मागील वर्षातील गुढीपाडव्याच्या आधीच्या पंधरवड्याच्या तुलनेत यंदा दुचाकींच्या नोंदणीत सुमारे दीड हजाराने वाढ झाली आहे. यावेळी मोटारींची नोंदणी सुमारे एक हजाराने तर मालमोटारींची नोंदणी सुमारे दीडशेने कमी झाली आहे. रिक्षांच्या नोंदणीत यावेळी पन्नासने वाढ झाली. बसच्या नोंदणीत यावेळी घट झाली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली.

संपाचा नोंदणीवर परिणाम नाही

यंदा वाहन खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. त्यामुळे वाहन खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. सरकारी कर्मचाऱ्यांनी नुकताच संप केला होता. परंतु, वाहन नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्याने त्यावर परिणाम झाला नाही. वाहन नोंदणीची प्रक्रिया थेट वाहन वितरकांकडून केली जात असल्याने संपाचा फटका बसला नाही, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.