पुणे: पुणे शहरातील विविध प्रलंबित प्रकल्पा बाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकी नंतर चंद्रकांत पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. त्यावेळी शिंदे-फडणवीस सरकार सावरकर गौरव यात्रा काढत आहे. तर उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथील सभेत सावरकर यांच्या बद्दल अपमान सहन करणार नसल्याची भूमिका मांडली आहे. भविष्यात दोघे एकत्र येऊ शकतात का? त्या प्रश्नावर भाजपचे नेते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, उद्धवजी आणि देवेंद्रजींना एकत्र आणण्याची फारच घाई झाल्याची दिसते. काल आणि आज देखील तोच प्रश्न विचारला आहे. तसेच मी भविष्यकर्ता देखील नाही आणि अशा गोष्टी एक्स्क्लुझिव्ह ली करायच्या असतात. त्यामध्ये खऱ्या अर्थाने एक मज्जा असते. त्या एक्स्क्लुझिव्हमध्ये देखील मी नसल्याचे सांगताच एकच हशा पिकला.