पिंपरी : श्रीक्षेत्र वढू व श्रीक्षेत्र तुळापूर यांना विशेष तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी स्वराज्य संघ शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. जगदगुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज माणिक महाराज मोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या

हेही वाचा : चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?

याप्रसंगी अन्न व औषध प्रशासनमंत्री संजय राठोड, जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे, कीर्तनकार बाजीराव महाराज बांगर, बाबासाहेब दिघे, माऊलीआबा कुंजीर, अण्णासाहेब बोडके, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : पुण्यातील हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या कामाला वेग

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म ठिकाण असलेल्या किल्ले शिवनेरीला ‘श्री शिवनेरीगड’ आणि छत्रपती संभाजी महाराजांचे जन्म ठिकाणास ‘श्री पुरंदरगड’ असे नामकरण करण्याची मागणी त्यांनी या वेळी केली. याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचा वीणा, पगडी, चिपळ्या, उपरणे, हार घालून शिष्टमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vadhu tulapur of pilgrimage demand cm eknath shinde swarajy sangh pimpri pune print news tmb 01
First published on: 13-10-2022 at 18:04 IST