पिंपरी- चिंचवड : राष्ट्रवादी पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणामध्ये अद्याप ही राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हे फरार आहेत. शशांक, करिष्मा आणि लता यांना न्यायालयाने २६ मे पर्यंत पोलीस कोठडी पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, वैष्णवी यांचे आई वडील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे न्याय मागितला आहे. अजित पवारांनी आमच्या मुलीला न्याय मिळवून द्यावा, अस आवाहन वैष्णवी चे वडील अनिल कस्पटे आणि आई स्वाती कस्पटे यांनी केल आहे.

वैष्णवी ला नेहमीच सासरच्या मंडळींनी जाच केला. वारंवार पैशांची मागणी तिचा पती आणि सासरचे मंडळी करत होते. प्रत्येक सणाला पैसे, सोन्याचे दागिने करावे लागायचे. वैष्णवीला पती शशांक मारहाण करायचा. असा आरोप वैष्णवीच्या आई वडिलांनी केला आहे. वैष्णवीच आणि शशांक चा प्रेम विवाह होता. त्याला आमचा विरोध होता. वैष्णवीला मुलांची दोन स्थळ देखील आली होती. त्या वेळी शशांक ने त्यांना फोन करून आमचं एकमेकांवर प्रेम आहे. अस सांगून तीच जुळणार लग्न मोडलं होत. अखेर दोघांचं लग्न लावून द्यावं लागलं.

लग्नात एक फॉर्च्युनर, ५१ तोळे सोने, ७ किलो चांदीची भांडी, एक दुचाकी दिले होते. या विवाहला अजित पवार हे देखील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते फॉर्च्युनर गाडीची चावी शशांकला देण्यात आली होती. तेव्हा, अजित पवारांनी मिश्कीलपणे तू फॉर्च्युनर मागितली की ते देतायत अस विचारलं होत. अशी माहिती वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी दिली आहे. आम्हला अजित पवारांनी न्याय मिळवून द्यावा. आमच्या लेकीची हत्या केली आहे. अजित पवारांच्या राज्यात लाडक्या बहिणी आहेत. ही देखील त्यांचीच बहीण होती. अस वैष्णवीची आई स्वाती कस्पटे सांगत असताना अश्रु अनावर झाले. वैष्णवी ला सासरचे व्यक्ती नेहमीच मारहाण करायचे असा गंभीर आरोप ही त्यांनी केला आहे. वैष्णवी च नऊ महिन्याचं बाळ आम्हाला सोपवावे अशी मागणी ही त्यांनी केली आहे. लवकरात लवकर फरार असलेल्या राजेंद्र हगवणे आणि मुलाला अटक करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हुंड्यात आलेली फॉर्च्यूनर पोलिसांनी केली जप्त

हुंड्यामध्ये देण्यात आलेली फॉर्च्यूनर गाडी बावधन पोलिसांनी जप्त केली आहे. वैष्णवीच्या लग्नामध्ये शशांकला अजित पवारांच्या हस्ते या गाडीची चावी देण्यात आली होती. ती गाडी पिंपरी- चिंचवडच्या बावधान पोलिसांनी जप्त केली आहे.