‘एमएसआरडीसी’च्या अनास्थेमुळे पथदिव्यांचे काम रखड

Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
Mumbai, tenders, projects,
मुंबई : तीन प्रकल्पांसाठी ८२ निविदा, आचारसंहितेनंतरच अंतिम निर्णयाची शक्यता
The Central Wildlife Board proposed a highway through the largest tiger project in the country
देशातील सर्वात मोठय़ा व्याघ्रप्रकल्पातून महामार्ग जाणार
one dead in Accident on JNPT Palaspe National Highway
जेएनपीटी पळस्पे राष्ट्रीय महामार्गावर अपघात, एकाचा मृत्यू

लोणावळा : लोणावळा शहरातून जाणाऱ्या मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर मनशक्ती केंद्र ते खंडाळय़ातील बॅटरी हिल दरम्यान पथदिवे लावण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षी लोणावळा नगरपरिषदेने सादर करूनही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) अद्याप या प्रस्तावाला ना हरकत दाखला न दिल्याने महामार्ग अंधारात आहे. महामार्गावरील अंधारामुळे गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

राष्ट्रीय महामार्गावर मनशक्ती केंद्र, वरसोली ते बॅटरी हिल दरम्यान पथदिवे लावण्यासाठी दोन कोटी ११ लाख रुपयांचा प्रस्ताव लोणावळा नगरपरिषदेने  गेल्या वर्षी सादर केला होता. नगरपरिषदेला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या कामासाठी ना हरकत दाखला हवा आहे. पथदिव्यांच्या कामास परवानगी मिळण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेने राज्य रस्ते विकास महामंडळाकडे प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता देण्यात आली असली तरी अद्याप प्रस्ताव मंजूर झाला नाही. तसेच ना हरकत दाखला मिळालेला नाही.  गेल्या काही वर्षांपासून वरसोली ते खंडाळय़ातील बॅटरी हिल दरम्यान असलेला मार्ग अंधारात आहे. 

लोणावळा शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई पुणे महामार्गावर अपघात झाले आहेत. रात्रीच्या वेळी अंधारामुळे वाहनचालकांना समोरून येणारे वाहनही दिसत नाही. पादचाऱ्यांना रस्ताही ओलांडता येत नाही. लोणावळा नगरपरिषदेने दहा किलोमीटर मार्गावर पथदिवे लावण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. रस्ते विकास महामंडळातील एका विभागाकडे हा प्रस्ताव असून हा प्रस्ताव तत्काळ मंजूर झाल्यास पथदिवे बसविण्याच्या कामास सुरुवात होईल, असे सांगण्यात आले.

जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर झालेल्या अपघातांमुळे चार दिवसांपूर्वी लोणावळा नगरपरिषदेच्या कार्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकारी, रस्ते विकास महामंडळ, आयआरबी कंपनीचे अधिकारी तसेच विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, रस्ते विकास महामंडळाच्या उपअभियंता प्रेरणा कोटकर यांची या वेळी उपस्थिती होती. अपघात रोखण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने तातडीने ना हरकत दाखला द्यावा, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केली.

राष्ट्रीय महामार्गावर वरसोली ते खंडाळा दरम्यान पथदिवे बसविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. ना हरकत दाखला न मिळाल्याने पथदिव्यांचे काम रखडले आहे.  सोमनाथ जाधव, मुख्याधिकारी, लोणावळा नगरपरिषद

राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. मात्र, वरिष्ठ कार्यालयाकडून अद्याप ना हरकत दाखला मिळालेला नाही.

प्रेरणा कोटकर, उपअभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ