लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करून वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. वसंत मोरे यांनी शुक्रवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. मोरे यांच्याकडे अनेक गाड्या, सोने आणि चांदी अशी मालमत्ता असल्याचे त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.

मोरे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे चार कोटी १६ लाख ६७ हजार ३६४ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. मोरे यांच्यावर तीन कोटी ४९ लाख २३ हजार ४३९, पत्नीवर १८ लाख ८९ हजार, तर मुलावर ४७ हजार १४७ रुपयांचे कर्ज आहे. मोरे यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. मोरे यांच्यावर सात गुन्हे दाखल आहेत. मोरे यांच्याकडे इनोव्हा, ऑडी आणि ॲम्बेसिडर या चारचाकी, तर बुलेटसह सहा दुचाकी आणि एक ट्रक आहे. मोरे यांच्याकडे ७० ग्रॅम, पत्नीकडे २७० ग्रॅम सोने आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा-वसंत मोरे गुपचूप आले, उमेदवारी अर्ज भरून गेले

मोरे यांच्याकडे पुणे जिल्ह्यातील आंबवणे, चिंचळे, बोपगांव, हिरपोडी, शिंदवणे, वेळू, कासुर्डी येथे शेतजमीन आहे. कात्रज येथे वाणिज्यिक गाळा आणि कात्रजमध्येच सदनिका असल्याचे त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.