पुणे शहरातील कात्रज भागात राहणारे मनसेचे माजी शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक वसंत मोरे हे नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतात. गेल्या वर्षी जोरदार पावसात गुढघ्याभर पाण्यात उभे राहून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओनंतर वसंत मोरे यांच्यावर कौतुकांचा वर्षाव झाला होता. आता अशीच एक घटना समोर आली आहे. त्यांनी वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका केली आहे.

काल रात्रीच्या सुमारास वसंत मोरे हे कात्रज चौकातून जात होते. त्यावेळी त्यांना प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. त्यादरम्यान वसंत मोरे यांना एका कार्यकर्त्याचा फोन आला की, चौकात एका चारचाकी वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे ते वाहन खांबाला जाऊन जोरात धडकले आणि त्यामुळे ते चारचाकी वाहन पलटी झाले. त्यावर वसंत मोरे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि पाहणी केली.

हेही वाचा – युक्रेनमधील धरणफुटीमुळे जगात अन्नटंचाईची शक्यता; पाच लाख हेक्टरवरील शेती बाधित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चारचाकी वाहन बाजूला केल्याशिवाय वाहतूक पूर्ववत होणार नाही, हे वसंत मोरे यांच्या लक्षात आले. त्यावर मोरे यांनी भाया वर करून पलटी झालेले वाहन बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मोरे यांना पाहून आणखी काही नागरिक त्यांच्या मदतीला आले, त्यामुळे पुढील काही मिनिटांत चारचाकी वाहन फुटपाथवर बाजूला करण्यात वसंत मोरे यांना यश आले. त्यामुळे चौकातील वाहतूक पूर्ववत होण्यास अधिक मदत झाली. त्यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीमधून सुटका झाली. वसंत मोरे यांच्या या कृतीचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.