पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन दिले. ’बलात्कार प्रकरणात न्यायालयात बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. असीम सरोदे यांची नियुक्ती करावी,’ अशी विनंती तिने निवेदनाद्वारे केली आहे.स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर २५ फेब्रुवारी रोजी दत्तात्रय गाडे याने शिवशाही बसमध्ये बलात्कार केला होता.
गाडेने वाहक असल्याची बतावणी केली होती. बलात्कार करून पसार झालेल्या गाडेला पोलिसांनी शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली. गाडेला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ‘ॲड. असीम सरोदे यांनी बलात्कार प्रकरण संवेदनशीलपणे समजून घेतले. त्यांनी मला आधार दिला. या प्रकरणात माझी बाजू मांडण्यासाठी ॲड. सरोदे यांची नियुक्ती करण्यात यावी,’ अशी विनंती तिने निवेदनाद्वारे केली आहे.