दि पूना र्मचट्स चेंबरच्या अध्यक्षपदी वालचंद संचेती यांची तर उपाध्यक्षपदी प्रवीण चोरबेले यांची निवड झाली. चेंबरच्या सचिवपदी जवाहरलाल बोथरा यांची आणि सहसचिवपदी अशोक लोढा यांची निवड करण्यात आली.
र्मचट्स चेंबरचे मावळते अध्यक्ष अजित सेटिया यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडून आलेल्या १५ सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. त्यानंतर आगामी दोन वर्षांसाठी नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. वालचंद संचेती चेंबरच्या कार्यकारी मंडळावर गेली ४५ वर्षे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी २२ वर्षे उपाध्यक्ष आणि १० वर्षे सहसचिव या पदांवर काम केले आहे. कॅम्प एज्युकेशन सोसायटी आणि ओसवाल बंधू समाज यांसह विविध संस्थांशी ते निगडित आहेत. प्रवीण चोरबेले यांनी महापालिका शिक्षण मंडळ सदस्य म्हणून काम पाहिले असून सध्या ते भाजप व्यापार आघाडीचे अध्यक्ष आहेत. वाणिज्य विश्व मासिकाचे संपादक म्हणून काम पाहिलेल्या बोथरा महावीर प्रतिष्ठान, आनंद प्रतिष्ठान या संस्थांचे पदाधिकारी आहेत. तर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, जैन सोशल ग्रुप आणि जय आनंद ग्रुपचे अशोक लोढा यांनी यापूर्वी सहसचिवपदी काम केले आहे.