पुणे : संततधार पावसाने कोंढवा गावठाण येथे एका वाड्याची भिंत कोसळल्याची घटना गुरुवारी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ११ रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. तर, शहरात दहा ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनांची नोंद करण्यात आली.

गेल्या आठवड्याभरातील पावसामुळे कोंढवा गावठाण येथील दत्त मंदिराजवळील एका रिकाम्या वाड्याची भिंत कोसळली. वाड्याची भिंत शेजारच्या घरावर पडल्याने या घरातील ११ रहिवासी अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. शहरामध्ये गुरुवारी दिवसभरात दहा ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनांची नोंद अग्निमशन दलाकडे झाली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आवारामध्ये झाड पडल्याची घटना सायंकाळी घडली. वाकडेवाडी येथील इराणी वस्ती, वानवडी येथील आझादनगर, औंध येथील परिहार चौक, एरंडवणा येथील प्राप्तीकर गल्ली, औंध येथील शेवाळे हॉस्पिटल, भवानी पेठेतील जुना मोटार स्टँड, सातवनगर येथील हांडेवाडी रस्ता आणि कात्रज येथील भाजी मंडई परिसरात झाड पडल्याच्या घटना घडल्या.

Florida woman’s pet dog scares off alligator Nail-biting video is viral
“क्या मगरमच्छ बनेगा रे तू!” कुत्र्याला पाहून मगरीने ठोकली धूम, पळत जाऊन तळ्यात मारली उडी! पाहा Viral Video
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका