बारामती : बारामती शहरातील पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या नीरा डाव्या कालव्याच्या आवर्तन बंद झाले आहे. उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्याने शहरात गुरुवार, ३० मेपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन बारामती नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

बारामती शहरात बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. बारामती शहरातून वाहणाऱ्या नीरा डाव्या कालव्यातील आवर्तनावर शहरातील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. नीरा डाव्या कालव्याचे चालू आवर्तन सध्या बंद झाले आहे. त्यामुळे शहरासाठी मर्यादित पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे, त्यामुळे ३० मेपासून बारामती शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.

हेही वाचा – मोसमी पाऊस २४ तासांत केरळात

हेही वाचा – बारावीच्या गुणपत्रिकांच्या वितरणाबाबत राज्य मंडळाने दिली माहिती, पुढील प्रवेशाचा मार्ग मोकळा

नीरा डाव्या कालव्याचे पुढील आवर्तन सुरू होईपर्यंत बारामतीत एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. आवर्तन सुरू झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत केला जाणार आहे. या काळात नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.

Story img Loader